राम मंदिर : भूमीपूजनाची पहिली निमंत्रण पत्रिका मिळाल्यानं इकबाल अन्सारी ‘खुश’, म्हणाले – ‘PM मोदींचं ‘राम’नामाच्या फेट्यानं स्वागत करण्याची इच्छा’

अयोध्या : उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये 5 ऑगस्टला होणार्‍या राम मंदिर भूमपूजनाची आमंत्रणे पाठवण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी कार्यक्रमाचे पहिले निमंत्रण बाबरी मशिदचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठवण्यात आले. निमंत्रण मिळाल्यानंतर अन्सारी खुश दिसले. त्यांनी म्हटले की, ही रामजींची इच्छा असेल की, मंदिर निर्मितीचे पहिले आमंत्रण मला मिळावे. मी हे स्वीकार करत आहे.

कोरोना महामारीच्या दरम्यान 5 ऑगस्टला पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर निर्मितीची पहिली वीट ठेवली जाणार आहे. कार्यक्रमात निवडक लोकांनाच बोलावण्यात आले आहे. यामध्ये बाबरी मशिदचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी आणि अन्य मुस्लिम पक्षकार हाजी महबूब यांचा समावेश आहे.

इक्बाल अन्सारी यांनी पूर्वी सुद्धा म्हटले होते की, भूमीपूजनात जर निमंत्रण मिळाले तर जरूर जाईन. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रामनामाच्या फेट्याने स्वागत करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. याशिवाय इक्बाल अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना रामचरित मानस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

रामाच्या नगरीत राहणे सौभाग्य
निमंत्रण मिळाल्यानंतर अन्सारी म्हणाले, भूमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मंदिर निर्मितीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजूने निर्णय देऊन वाद संपवला आहे. आता कोणताही वाद होऊ नये. दोघे मिळून राहू. अन्सारी म्हणाले, प्रभू श्रीराम कोणत्याही एका समजाचे नव्हते. आम्ही त्यांच्या नगरीत राहतो, हे आमचे सौभाग्य आहे.

अन्सारी म्हणाले, राम मंदिर निर्मितीच्या कार्यात आम्ही संत आणि त्यांच्या करोडो समर्थकांसोबत आहोत. मंदिर बनल्याने अयोध्येच्या विकासासह आमच्या समाजाचा विकाससुद्धा होणार आहे. लोकांना रोजगाराची संधी मिळेल.

मोहन भागवत सुद्धा होणार सहभागी
5 ऑगस्टला होणार्‍या भूमीपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संघ प्रमुख मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सोमवारी कार्ड वाटण्यास सुरूवात झाली आहे. कार्डावर निमंत्रक म्हणून नृत्यगोपाल दास यांचे नाव आहे. याशिवाय सीएम योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे नाव छापले आहे.