विवाहित महिलेला प्रियकरासोबत ‘रंगेहाथ’ पकडले, नातेवाईकांनी दोघांसोबत केले असे काही

 अयोध्या : वृत्तसंस्था – लग्नानंतर प्रियकरासोबत संबंध ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. विवाहित महिलेला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांचे नाक कापले. ही घटना उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे घडली आहे. या महिलेचा प्रियकर दुसऱ्या समाजातील असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत असून या प्रकरणी अयोध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अयोध्येतील पिपरा गावातील 30 वर्षीय महिलेचे लग्नानंतरही प्रियकरासोबत संबंध होते. दोघेही एकमेकांना लपूनछपून भेटत होते. महिलेच्या कुटुंबीयांना याची माहिती कळताच त्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. संतापलेल्या तिच्या सासरच्या लोकांनी दोघांचेही नाक कापले. त्यामुळे दोघे रक्तबंबाळ झाले. त्याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा तरुण यापूर्वीही महिलेच्या घरी लपूनछपून भेटायला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सासरच्या लोकांनी या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. सासरच्या लोकांनी गावासमोर दोघांना बेदम चोप देत दोघांचे नाक कापलं. तिच्या प्रियकराला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

You might also like