5100 ‘कलश’ – ‘राम’नामात मग्न ‘अयोध्या’, जाणून घ्या कशी चालू आहे ‘भूमिपूजना’ची तयारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 5 ऑगस्टचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. अयोध्या सुशोभित केली आहे त्यामुळे अयोध्येत दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही भव्य स्वागत होणार आहे, अशा परिस्थितीत बुधवारी अयोध्येत काय-काय विशेष होणार आहे ते जाणून घेऊया…

– भूमिपूजनासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी 5100 कलश तयार करण्यात आले आहेत. भूमिपूजनामध्ये काही कलशांचा उपयोग केला जाईल आणि काही कलश रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येतील जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काफिला जाईल. अयोध्येत आज आणि उद्या त्यांच्यात दिवे पेटविण्यात येतील.

– जेव्हा पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील तेव्हा सरयू दर्शन, पूजन, आचमन करतील. मग ते हनुमानगढीस येतील आणि येथील हनुमानजींच्या दरबारात दर्शन पूजन परिक्रमा करतील. येथे पंतप्रधान मोदींना आशीर्वाद आणि सन्मान म्हणून एक फेटा बांधला जाईल तसेच गदा सोपविण्यात येईल.

– अयोध्यामध्ये आज संध्याकाळपासून बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल. तथापि, या वेळी शहराच्या बाजारपेठा खुल्या असतील, परंतु पाचपेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी जमू शकणार नाहीत.

– पंतप्रधान मोदींचे स्वागत करणाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीचे समर्थक असलेले इक्बाल अन्सारीही असतील. यावेळी ते पंतप्रधान मोदींना रामचरितमानस, राम नामाची पगडी देतील.

– आतापासूनच अयोध्येत भजन कीर्तन सुरू झाले आहे. संतांनी सर्वत्र तळ ठोकला आहे आणि लोकांना रामचरित मानस पाठ करण्यास सांगितले गेले आहे.

– अधिक लोकांनी भूमिपूजनाच्या ठिकाणी येऊ नये, घरात दिवे लावावेत आणि राम नामाचा जाप करावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. कोरोना संकटामुळे सामाजिक अंतराचे पालन केले जात आहे.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे तीन तास अयोध्येत थांबतील. प्रथम ते हनुमानगढीला जातील, त्यानंतर रामलाला विराजमान चे दर्शन करतील. त्यानंतर भूमिपूजन करतील.