Ayurveda For Diabetes | सकाळी रिकाम्यापोटी 1 चमचा खा 5 आयुर्वेदिक वनस्पतींची पावडर, पूर्ण दिवस वाढणार नाही Blood Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayurveda For Diabetes | मधुमेह (Diabetes) हा एक धोकादायक आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्याला ब्लड शुगर (Blood Sugar) डिसिज असेही म्हणतात. हा रोग मुख्यत्वे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) आणि इन्सुलिनवर (Insulin) परिणाम करतो. यामध्ये स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी इलाज नाही आणि तो केवळ योग्य आहार आणि व्यायामाद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो (Ayurveda For Diabetes).

 

मधुमेहास कारणीभूत अनेक घटक आहेत. तज्ज्ञांच्या मते तणाव, आनुवंशिकता, जास्त वजन आणि बैठी जीवनशैली (Stress, Heredity, overweight And Sedentary Lifestyle) ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार (Obesity And Heart Disease) यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते (Ayurveda For Diabetes).

 

जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुम्हाला ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही आयुर्वेदातील मधुमेहावरील काही हर्बल उपाय (Diabetes Ayurvedic Treatment) देखील करून पाहू शकता. हे आयुर्वेदिक उपाय ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी आणि स्थिती बिघडण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे हर्बल उपाय इंसुलिनचे उत्पादन वाढवतात आणि स्वादुपिंड मजबूत करून ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) करतात.

 

गुडमार (Gurmar)
गुडमार हे जिमनेमा सिल्वेस्ट्रे म्हणून ओळखले जाते. ही एक बारमाही वृक्षाच्छादित वेल आहे जी भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढते. त्यात काही संयुगे असतात ज्यात फ्लेव्होनॉल्स आणि ग्वारमारिन यांचा समावेश होतो ज्यांचा मधुमेहावर सकारात्मक प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.

 

दुपारच्या व रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने गुडमारच्या पानांचे चूर्ण पाण्यासोबत घ्या. हे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे शोषण नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

सदाफुलीची पावडर (Periwinkle Powder)
सदाफुली पेरीविंकल म्हणून ओळखले जाते आणि भारतात सामान्यतः आढळणारी औषधी वनस्पती आहे. त्याची गडद हिरवी पाने टाईप-2 मधुमेहावर (Type-2 Diabetes) नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला काही ताजी पाने चघळण्याची गरज आहे.

 

ती वापरण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सदाफुली वनस्पतीची गुलाबी फुले घ्या आणि त्यांना एक कप पाण्यात उकळवा. पाणी गाळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

 

विजयसार पावडर (Pterocarpus Marsupium Powder)
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजयसार ओळखले जाते. या औषधी वनस्पतीचे अँटी-हायपरलिपिडेमिक गुणधर्म आहेत जे शरीरातील एकूण कोलेस्टेरॉल, कमी घनतेचे लिपो-प्रोटीन आणि सीरम ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत करते.

 

हे मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करते ज्यामध्ये वारंवार लघवी होणे, जास्त खाणे आणि अवयवांमध्ये जळजळ होणे यांचा समावेश होतो.
हे पचन तंत्र सुधारते आणि स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन उत्पादन पातळी वाढवते. हे फक्त एका ग्लास पाण्यात टाकायचे आणि ते रात्रभर तसेच ठेवा.
सकाळी ते रिकाम्यापोटी प्या. तुम्ही विजयसार पावडर स्वरूपातही सेवन करू शकता.

 

गुळवेल पावडर (Heart-Leaved Moonseed Powder)
गुळवेलचे वैज्ञानिक नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया आहे आणि ते अमरत्वाचे मूळ म्हणून ओळखले जाते.
ब्लड शुगर नियंत्रित करण्यात वनस्पतीची पाने मोठी भूमिका बजावतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे.
त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतात. हे एक नैसर्गिक मधुमेहविरोधी औषध आहे जे साखरेची लालसा कमी करते.

याव्यतिरिक्त, ते स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे उत्पादन वाढवते. हे रक्तातील इन्सुलिन आणि ग्लुकोज नियंत्रित करते.
गुळवेल पचन तंत्र सुधारण्यास देखील मदत करते, जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आहे.
गुळवेल पावडर किंवा औषधी वनस्पतीची पाने एक ग्लास पाण्यात टाकून सकाळी लवकर प्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ayurveda For Diabetes | 4 ayurvedic herbs powder that can control blood sugar level in diabetic patients naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी ब्रश करण्यापूर्वी चघळावीत ‘ही’ पाने, ब्लड शुगर नेहमी राहील कंट्रोल

 

Health Tips | कडू कारल्याची भाजी खाण्याचे 5 गोड फायदे कोणते?; जाणून घ्या 

 

Benefits Of Milk With Gulkand | उन्हाळ्यात दुधासोबत मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; एकदम आराम वाटेल, जाणून घ्या