त्यावेळी अजीम प्रेमजींच्या वडिलांनी जिन्नांची ‘ऑफर’ नाकारली, नाहीतर Wipro पाकिस्तानमध्ये असती, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन – ‘विप्रो’ ही भारतातील टॉपची सॉफ्टवेअर कंपनी. या कंपनीची स्थापना अजीम हाशिम प्रेमजी यांनी 80 च्या दशकात केली. तसेच अजीम प्रेमजी यांच्या संपत्ती आणि त्यांच्या दानशूरपणामुळे त्यांना भारताचे बिल गेट्सही म्हटले जाते. त्यांच्या वडिलांच्या एका निर्णयामुळे भारताला आज एवढा मोठा उद्योगपती भेटला आहे. नाहीतर अजीम प्रेमजी आज पाकिस्तानमध्ये असले असते.

अजीम प्रेमजीना भारतातील आयटी क्षेत्रातील ‘बादशहा’ म्हणून आज संबोधलं जातं. ते फक्त व्यवसायात पुढे नसून ते खूप मोठे दानशूरही आहेत. अजीम प्रेमजी सलग 1999 ते 2005 भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अजीम प्रेमजी यांनी 2019 मधील सगळ्यात मोठे दानशूर व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी त्यावर्षी 7.6 अरब डॉलरचे विप्रोचे शेअर्स शिक्षणासाठी त्यांच्या फौंडेशनला दान केले आहेत. यकारणांमुळेच बिल गेट्स अजीम प्रेमजी यांचे मोठे प्रशंसक राहिले आहेत.

अजीम प्रेमजींचा जन्म 24 जुल 1945 ला मुंबईत एका शिया कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज मूळचे गुजरातमधील कच्छचे रहिवासी होते. त्यांचे वडील मुहम्मद हाशिम प्रेमजी एक प्रसिद्ध व्यावसायिक होते. तसेच ते ‘राइस किंग ऑफ बर्मा’ या नावानेही ओळखले जात होते. हाशिम प्रेमजी यांनी 1945 साली महाराष्ट्रातील जळगावमध्ये ‘वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड’ नामक एक कंपनी स्थापली होती. ही कंपनी त्यावेळी सुर्यफुलचे तेल आणि कपड्याचे साबण बनवीत होती.

1944 याकाळात पाकिस्तानची मागणी चांगलीच जोर धरत होती. त्याकाळात मोहम्मद अली जीना यांनी हाशिम प्रेमजीना ‘पाकिस्तान नॅशनल प्लानिंग कामिटी’ मध्ये येण्याचे आवाहन केले होते. पण ते हाशिम प्रेमजी यांनी नाकारले होते. त्याकाळात त्यांना भारतात राहणेच योग्य वाटत होते.

काही वर्षांनी भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाल्यावर जीनांना पाकिस्तानचा विकास करण्याची चिंता होती. यामुळे त्यांना दूरदृष्टी असणाऱ्या उद्योगपतींची गरज होती. त्यावेळेस जीनांना अजून एकदा हाशिम प्रेमजी यांना भारतात येण्याचे आवाहन केले. दुसऱ्या वेळेसही प्रेमजी यांनी पाकिस्तानात येण्यास नकार दिला. हा नकार भारतासाठी खूप लाभदायक ठरला आहे. नाहीतर आज जगातील सॉफ्टवेअर मधील प्रतिष्ठित कंपनी ‘विप्रो’ पाकिस्तानात असली असती.

अजीम प्रेमजी यांना शिक्षणासाठी ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’ अमेरिकेला पाठवलं होतं. पण हाशिम प्रेमजी यांचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे अजीम प्रेमजी यांना माघारी भारतात यावं लागलं. यावेळेस अजीम प्रेमजी यांचं वय फक्त 21 होतं.

भारतात आल्यावर त्यांनी वडिलांचा व्यवसाय सांभाळला आणि विप्रोची स्थापना केली. यानंतर त्यांनी मागे फिरून पाहिलं नाही. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेतील ‘सेंटिनल कंप्यूटर कॉरपोरेशन’ या कंपनीसोबत लहान कॉम्प्युटर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यापद्धतीने अजीम प्रेमजी यांनी एका साबण बनवणाऱ्या कंपनीचं रूपांतर आयटी सेक्टरकडे वळवून ‘विप्रो’ जगप्रसिद्ध कंपनी निर्माण केली.