Bad Breath | तोंडातून दुर्गंधी येते का? यापासून सुटका मिळवण्यासाठी करा हे 3 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकदा काही लोकांच्या तोंडाला दुर्गंधी (Bad Breath) येते, त्यामुळे त्यांना लाजिरवाणे वाटते. श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस (Halitosis) म्हणतात. काही लोक दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे ब्रश करतात, तरीही त्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या तोंडात वाढणार्‍या बॅक्टेरिया (Bacteria) मुळे होते. श्वासाच्या दुर्गंधीमुळे लोकांना इतरांशी बोलण्यात संकोच वाटतो आणि आत्मविश्वासही कमी होतो. (Bad Breath)

 

तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या का होते (Reason Of Bad Breath Problem) :
बिघडलेला आहार आणि खराब जीवनशैली याशिवाय दात किडणे, हिरड्यांचा त्रास, पायरिया, शरीरात झिंकची कमतरता, तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन, दातांची आणि तोंडाची योग्य काळजी न घेणे, मधुमेह आणि खराब दात असल्याने श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. (Bad Breath)

 

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करतात. मात्र, काही घरगुती उपायांनीही या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

 

1. तुरटी (Alum) :
एक ग्लास पाण्यात तुरटी टाका आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे तशीच ठेवा. नंतर ती बाहेर काढा आणि हे पाणी बाटलीत भरून ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी दात घासल्यानंतर तुरटीच्या पाण्याने गुळणी करा. सुमारे 2-3 मिनिटे तोंडात पाणी भरा. असे केल्याने श्वासाची दुर्गंधी कमी होते.

2. जास्त पाणी प्या (Drink more water) :
श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, जास्तीत जास्त पाणी प्या. कारण त्यामुळे तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया कमी होतात.

 

3. बेकिंग पावडर (Baking powder) :
तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग पावडर प्रभावी आहे. यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. नंतर या पाण्याने गुळणी करा. याचा नियमित वापर केल्यास श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळू शकते.

या टिप्स वापरून तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता (these tips can help you get rid of bad breath).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Breath | bad mouth breath and foul breath can be removed by these home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fatty Liver | सकाळी उठल्यावर डोळ्यांवर येत असेल सूज, तर असू शकतो फॅटी लिव्हरचा संकेत; जाणून घ्या सविस्तर

Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या

Arthritis Cause Cauliflower | फ्लॉवर खाल्ल्याने वाढू शकते युरिक अ‍ॅसिड, हिवाळ्यात होऊ शकतो चालण्या-फिरण्याचा त्रास