Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sudden Weight Loss | शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आजच्या युगात वजन कमी करण्यासाठी लोक सर्व प्रयत्न करतात. परंतु, आहारात कोणताही बदल न करता किंवा शारीरिक श्रम न करता तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले असेल, तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. (Sudden Weight Loss)

 

तज्ज्ञ सांगतात की, जर तुमचे वजन 6 महिन्यांत अचानक 5% कमी झाले तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. मात्र, वजन झपाट्याने कमी होणे जीवन बदलणार्‍या किंवा तणावपूर्ण घटनांमुळे सुद्धा होऊ शकते.

 

1. आतड्यांसंबंधी रोग (Intestinal diseases) :
आतड्यांसंबंधी किंवा पोटाशी संबंधित कोणत्याही आजारामुळे शरीर पुरेसे अन्न घेऊ शकत नाही. शरीरापर्यंत पोचणारे अन्नही नीट वापरले जात नाही. (Sudden Weight Loss)

2. मधुमेह (Diabetes) :
वजन कमी होण्याचे एक कारण टाइप 1 मधुमेह असू शकते. तुम्हाला टाइप 1 मधुमेह असल्यास,
रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील (Pancreas) इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींवर हल्ला करते.
इन्सुलिनशिवाय, शरीर उर्जेसाठी ग्लुकोज वापरू शकत नाही. यामुळे रक्तातील साखर वाढते.

 

3. कर्करोग (Cancer) :
कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये जलद वजन कमी होते. कारण कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमुळे,
त्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते, जे वजन कमी होण्याचे कारण आहे.

 

4. एड्स (AIDS) :
एचआयव्ही हा देखील इतर व्हायरसप्रमाणेच एक व्हायरस आहे, फरक एवढाच आहे की रोगप्रतिकारक शक्ती इतर व्हायरसचा नाश करते,
इथे हा व्हायरस नष्ट न होता उलट, तो रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करतो. यामुळे या व्हायरसने ग्रस्त लोकांचे वजन अचानक कमी होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Arthritis Cause Cauliflower | arthritis cause cauliflower can increase uric acid in the body may be trouble in walking in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Government | दिवाळी संपताच शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा करणार मोठे प्रशासकीय फेरबदल

Sanjay Aggarwal | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेचे मोठे वक्तव्य, म्हणाली – ‘बॉलिवूडमध्ये महिलांना…’