Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मनसेच्या (Pune MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशातच आता मनसेला मुळापासून हादरवणारा मोठा धक्का मिळणार असल्याचे मेसेज (Message) सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मर्जीतले आणि मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. यावर स्वत: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

सध्या बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) मनसेत सक्रिय नसले तरी एकेकाळी त्यांच्या शब्दाला पक्षात मोठी किंमत होती. राज्यात मनसेचे वारे असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये (MLA) बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता. राज ठाकरे यांच्यापर्यंत थेट जाऊ शकणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान आहे. परंतु हेच बाळा नांदगावकर ‘घरवापसी’ करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्टपणे मांडली.
सध्या राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर (Pune Tour) आहेत.
नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो.
राज ठाकरे पुण्याला रवाना झाले तेव्हा मी मुंबईत परत आलो.
माझ्या मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयाचे 18 डिसेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
त्याच्या तयारीसाठी मी मुंबईत परत आलो.
मात्र मी पुण्याच्या दौऱ्यात न दिसल्याने काहीजणांनी मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या.
मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Bala Nandgaonkar | MNS Leader bala nandgaonkar explanation on viral message he will resign mns soon join shiv sena, nandgaonkar said…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक

Deepika-Ranveer | चित्रपट ‘83’ च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणनं घातला बॅकलेस ड्रेस, फोटो झाले व्हायरल

HM Amit Shah Pune Visit | केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन