काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना उपमुख्यमंत्रिपद ? सत्तास्थापनेला ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्तास्थानेला वेग आला आहे. दिल्लीत सत्तावाटपावरुन हलचालींना वेग मिळाला आहे. आज दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा सुरु आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळणार असे दिसत आहे.

या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जागी उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. आता त्यांची बढती होणार अशी शक्यता बाळवली आहे. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असे दिसते आहे.

याशिवाय विधानसभा अध्यक्षपदी दोन्ही चव्हाणांपैकी एका चव्हाणांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी दोन्ही पैकी एका चव्हाणांना संधी मिळू शकते.
परंतू तुर्तास यावर अधिकृत माहिती समोर आली नाही. पण ही चर्चा तर नक्कीच आहे की मुख्यमंत्रिपद शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणार.

Visit : Policenama.com