मुंबईच्या ‘लाईफलाईन’ वरून टोलवाटोलवी !

मुंबई:पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईची लाईफलाईन अर्थातच लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने जी माहिती मागवली होती ती देण्यात आली आहे. आता सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे रेल्वे आणि राज्य सरकार लोकल सुरु करण्यावरून टोलवाटोलवी करत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली होती मात्र, अनलॉकच्या ५ व्या टप्प्यात लोकल सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करावी असा प्रस्ताव रेल्वेला पाठवत माहिती मागवली होती. मात्र, आम्ही राज्य सरकारला माहिती दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवांशांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत सरकारकडून उत्तर आले नाही, असे सांगत रेल्वेने लोकल सुरु करण्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे.