‘कोरोना’मुळे नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यावर बंदी, गृहविभागाकडून सूचना

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नवरात्री (Navaratri) त गरबा (Garba) किंवा दांडीया (Dandiya) खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागा (Home Department) ने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्यात . त्यामुळे या वर्षी गरबा(Garba) आणि दांडिया (Dandiya) खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.

ही आहे नियमावली
सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवनगी घेणे आवश्यक
नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादित ठेवावी गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी
देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता किमान व्यक्तीचं कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.