‘अल्काईल अमाईन्स’ कंपनीच्या निषेधार्थ कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे असणाऱ्या अल्काईल अमाईन्स या केमिकल या कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर कुरकुंभ गावातील ग्रामस्थांनी आज अल्काईल अमाईन्स कंपनीचा निषेध करत कुरकुंभ गावातील महाविद्यालय, शाळा आणि संपूर्ण बाजार पेठेतील व्यवहार बंद ठेवत निषेध नोंदवला.

kurkumbh

अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. आगीच्या रौद्ररुपामुळे जवळपासच्या गावांतील लोकांनी स्थलांतर केले होते. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्‍यात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये वेळोवेळी अशा स्फोटाच्या घटना घडत असतात आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत असते.

अशा घटनांचा होणारा त्रास वेळीच थांबवा या मागणीसाठी कुरकुंभ गावातील ग्रामस्थांनी आज शुक्रवारी संपूर्ण कुरकुंभ गाव बंद ठेवून कंपनीचा निषेध केला आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –