जादू-टोणा करण्यासाठी सुशांतच्या आकाउंटमधून काढले गेले होते पैसे ? समोर आले डिटेल्स

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात आता एक वेगळाच अँगल समोर आला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह बरेच आरोप लावले आहेत. यासह रियाने सुशांतवर काळा जादू केल्याचा आरोपही या कुटुंबाने केला आहे. या दरम्यान आता सुशांतसिंह राजपूतच्या कोटक महिंद्रा बँकेकडून बँक खात्याचा तपशील समोर आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी त्याच्या खात्यातून तीन वेळा पैसे काढले गेले, तर एकदा पैसे काढून एका पंडिताला दिले गेले. सुशांतच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, या पैशातून रिया चक्रवर्तीने अभिनेत्यावर जादू टोना केला. दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये पूजा / ब्लॅक मॅजिकच्या नावावर पैसे काढण्याचा प्रकार थांबला.

पूजेच्या नावाखाली सुशांतच्या खात्यातून काढले गेले पैसे

14 जुलै 2019 – 45,000 रुपये

22 जुलै 2019 – 55,000 रुपये आणि – 36,000 रुपये

2 ऑगस्ट 2019 – 86,000 रुपये

8 ऑगस्ट 2019 – 11,000 रु

15 ऑगस्ट 2019 – 60,000 रुपये

हे पैसे काढून घेतल्यानंतर कधीही कोणतीही पूजा झाली नाही.

दरम्यान, याआधी सुशांतसिंह राजपूतच्या सीएने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले आहे की, सुशांतच्या वडिलांनी केलेल्या दाव्याच्या उलट सुशांतच्या खात्यातून जास्त व्यवहार झालेला नाही. इतकेच नाही त्याच्या खात्यात इतकी रक्कम देखील नाही, जितका दावा सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. सीए संदीप श्रीधर यांनी सांगितले की रियाच्या खात्यावर पाठविलेले हजारो रुपये आणि रियाच्या आईने पाठविलेले 33000 रुपये व्यतिरिक्त कोणताही मोठा व्यवहार झालेला नाही. संदीपने सांगितले की, सुशांत एक फिल्म स्टार असल्याने त्याला आपली जीवनशैली आणि खर्च सांभाळावा लागत असे. तो खरेदी, घरभाडे, प्रवास असे खर्च करत असे. सुशांत आणि रिया बर्‍याच वेळा एकत्र फिरत असत. याखेरीज सुशांतचे उत्पन्न गेल्या एका वर्षात खूप कमी झाले. संदीपने सुशांतच्या जानेवारी 2019 ते जून 2019 पर्यंतचच्या खात्याचा खुलासा केला होता.