‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या सिनेमाच्या नादानं हाजारो लोकांचं कोट्यावधी रूपयांचं ‘नुकसान’, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकांची फसवणूक करण्यासाठी काही लोक आजकाल नवीन नवीन युक्त्या वापरताना दिसत आहेत. एक बॉलिवड सिनेमाशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आलं आहे ज्याची अ‍ॅक्ट्रेस आहे सनी लिओनी. 12 सप्टेंबर 2017 मध्ये तेरा इंतजार या सिनेमाचं प्रमोशन होतं. यासासाठी जवळपास एक हजार लोक आले होते. ब्लू फॉक्स मोशन पिक्चर्स प्रायवेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसनं याद्वारे इंडस्ट्रीत पैसे गुंतवून मोठा नफा मिळवण्यासाठी आमीष दाखवलं. 2 लाख गुंतवा आणि एका वर्षात 5 लाख मिळवा अशी स्किम सांगण्यात आली. त्यांच्या जाळ्यात अडकून दिल्ली एनसीआरच्या 16 लोकांनी 16 लाख गमावले. समोर आलेल्या माहितीनुसार, या कंपनीत जवळपास 14 हजार लोकांनी पैसे लावले होते ज्यांचं कोटींचं नुकसान झालं.

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील लोकांची फसवणूक

लोकांच्या तक्रारीनंतर सुरुवाती तपासानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं घोटाळ्याप्रकरणी त्यांनी कलम 406, 420 आणि कलम 120 B नुसार केस दाखल केली. या घोटाळ्यात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील लोकांची फसवणूक झाली. मोहाली मधील 200 लोकांनी आपले 190 कोटी गमावल्याची माहिती आहे. या कंपनीचा मास्टरमाईंड मनु प्रशांत विग आहे. प्रशांतला मोहालीमध्ये नोव्हेंबर 2018 मध्ये पत्नीसह ताब्यात घेतलं होतं.

कंपनीच्या 4 डायरेक्टरनं मिळून लावाला लोकांना चुना

कंपनीच्या प्रमोशन प्रोग्राममध्ये सौहेल खान आला होता असेही आरोप करण्यात आले आहेत. असंही म्हटलं जात आहे की कंपनी क्रिप्टोकरंसी आणि मल्टीलेवल मार्केटींग दोन्हीसोबत डील करत होती. कंपनीच्या अनेक इनवेस्टमेंट स्किम असल्याचीही माहिती आहे. दिल्लीच्या बाराखंभा रोडवर त्यांचं ऑफिस होतं. प्रशांतव्यतिरीक्त आणखी 3 डायरेक्टर होते. धर्मवीर सिंह आणि विजेंद्र सिंह देखील प्रमोशन प्रोग्राम कंडक्ट करत होते. इओडब्ल्यूनं सुरुवातीच्या तपासादरम्यान चारही डायरेक्टरला नोटीसी दिल्या. परंत तपासासाठी कोणीही सहभागी झालं नाही. धर्मवीर आणि विजेंद्र यांनी सांगितलं की, कंपनीचेही 30 लाख बुडाले आहेत.