बारामतीचा जनरल डायर मुलासाठी मावळमध्ये मते मागतोय

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाईन – बारामतीचा जनरल डायर मुलासाठी बारामतीत येऊन मते मागत आहे. बिघडलेल्या मुलाला सुधरवण्यासाठी त्याला लोकसभा निवडणुकीला उभे केले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण सावध व्हा मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीला एक हि मत पडता कामा नये असे आवाहन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत केले आहे. ते वडगाव मावळ या ठिकाणी बोलत होते.

वडगाव मावळ येथे श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार संजय उर्फ बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. मावळ मधील गोळीबार प्रकरणी चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी शेतकरी आणि भारतीय किसान मोर्चाच्या सदस्यांना बोलावले होते. त्या बैठकीत तुम्ही किती हि विरोध करा मावळ बंदनळ योजना होणारच. वेळ पडल्यास आम्ही पोलीस बळाचा वापर करू असे अजित पवार यांनी त्या बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांना धमकावले होते. आता हाच बारामतीचा जनरल डायर मावळमध्ये येऊन आपल्या पोरांसाठी मते मागतो आहे असे विजय शिवतारे म्हणले आहेत.

मावळ मधील गोर गरीब शेतकऱ्यांनी सावध राहावे. माझा प्रत्येक शब्द खरा आहे. मी बोलतो आहे हे राजकीय भाषण नाही. त्यामुळे मावळ मधील शेतकऱ्यांना श्रध्दांजली व्हायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला एक हि मत देऊ नका असे विजय शिवतारे म्हणाले आहेत. १९९१ साली शरद पवार आम्हाला म्हणाले कि माझ्या पुतण्याला मत द्या तेव्हा आम्ही मते दिली आणि आमचा खूप मोठा विश्वासघात झाला. तसा तुमचा विश्वासघात व्हायचा नसेल तर राष्ट्रवादीला मते देऊ नका असे विजय शिवतारे यांनी म्हणले आहे. पंजाबमध्ये अमृतसर जवळ जालियनवाला बागेत निशस्त्र जमलेल्या स्वातंत्र्यसैनिकांवर इंग्रज अधिकारी जनरल डायर याने गोळीबार केला आणि त्यात हजारो निष्पाप भारतीय लोकांचे बळी गेले. त्याच जनरल डायरीची उपमा विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिली आहे.

You might also like