Baramati Lok Sabha Election 2024 | दौंड तालुक्यात सुनेत्रा पवारांच्या प्रचार दौऱ्याकडे भाजपाची पाठ?, दोन-चारजणांची उपस्थिती संभ्रमात टाकणारी

यवत / पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सर्वत्र प्रचार दौरे सुरू केले आहेत. मात्र, दौंडमध्ये सुनेत्रा पवारांना आलेला अनुभव टेन्शन वाढवणारा होता. कारण येथील गावांमधील प्रचार दौऱ्याकडे भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते. स्थानिक भाजपाचा हा निरूत्साह अजित पवार यांची चिंता वाढवणारा आहे.

सुनेत्रा पवार यांच्या दौंड तालुक्यातील गाव भेट दोऱ्यात दोन-चार कार्यकर्ते सोडले तर मोठ्या संख्येने नेत्यांनी दांडी मारल्याने दौंड तालुक्यात संभ्रमाची स्थिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या सायंकाळी साडेसातच्या नाथाचीवाडी दौऱ्यात भाजपाचे पदाधिकारी गैरहजर होते. भाजपाचे दोन-चार कार्यकर्तेच उपस्थित होते. (Baramati Lok Sabha Election 2024)

सुनेत्रा पवारांचा दौरा कानगाव येथून सुरू झाला. त्यानंतर हातवळण, कडेठाण, दापोडी, खोपडी, नानगाव, पारगाव, गलांडवाडी, खुटबाव, एकेरीवाडी, देलवडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी, यवत येथे दौरा झाला. देऊळगाव गाडा येथे पीर यात्रेनिमित्त दर्शन घेतले.

या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे,
विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, संजय इनामके, अनिल चोरमले, उद्धव चोरमले,
अनिल नागवडे, भाऊसाहेब आवाळे, दिगंबर ठोंबरे, योगेश हाके, संदीप गडदे इत्यादी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका