बारामतीमधील हातभट्टया उध्दवस्त, पावणे दोन लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामतीत सुरू असणार्‍या हातभट्टी अड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. विविध भागातील तब्बल 8 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नितीन पारधी (रा. बारामती बस स्टॅन्ड), ज्ञानेश्वर पवार (रा. गुणवडी), फूलन देवी थोरात (रा. सिद्धार्थ नगर), अलका श्रीकांत पवार (रा. पिपळी), बाबाजान शेख (रा.सांगवी), पांडुरंग बाबल्या भोसले, रोहिदास रामदास मदने (रा. घाडगे वाडी), बाळासाहेब गुलाबराव घाडगे (रा. घाडगे वाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

illegal liquor

बारामती विभागात सुरू असणार्‍या अवैध धंद्यावर जोरदार कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. दरम्यान, बारामतीत विविध भागात हातभट्टीचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, बारामती गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने परिसरात छापे टाकले. यावेळी पोलिसांना 8 ठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे समोर आले. हे अड्डे उद्वस्त करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 8 ठिकाणावरून 1 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज जप्त करणयात आला आहे. तर, बनविलेला हातभट्टीचा साठा उद्वस्त करण्यात आला आहे. अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास त्याबाबत पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/