आता बास झाले BCCI चा ICC ला ‘इशारा’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ऑस्ट्रेलियात प्रस्तावित असलेल्या यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत आयसीसीकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. दोन वेळा बैठक बोलावली, पण त्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला नाही. टी-20विश्वचषकाच्या आयोजनाच्या निर्णयावर आयपीएल 2020 आयोजन अवलंबून आहे. आयसीसीकडून विश्वचषकाबाबतच्या निर्णयाला उशीर होत आहे, त्यामुळे आता बीसीसीआयने बाकीच्या गोष्टींचा विचार न करता स्वत:चा उर्वरित वर्षाचा कार्यक्रम तयार करेल, असा इशारा खजिनदार अरूण धुमाळ यांनी दिला आहे.

कोरोनामुळे कोणत्याही क्रीडा प्रकाराची यातून सुटका झाली नाही. पण आता मात्र आपल्याला येणार्‍या काळासाठी तयार राहणे आवश्यक आहे. इतर खेळांप्रमाणेच क्रिकेटदेखील आता हळूहळू सुरू करणे गरजेचे आहे.म्हणूनच बीसीसीआय आता उर्वरित वर्षासाठीचा कार्यक्रम तयार करणार आहे. आयसीसीआय काय निर्णय घेईल हे आपल्या हातात नाही. सध्या असे गृहित धरू या की विश्वचषक लांबणीवर टाकण्यात आला आहे, तर मग त्याची घोषणा जेव्हा व्हायची असेल तेव्हा होऊ द्या. पण आता बास झाले, आपल्या पद्धतीने उर्वरित वर्षाची आखणी करणार आहे, असे धुमाळ म्हणाले.