सावधान ! ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा काही मिनीटांमध्ये कष्टाची कमाई होईल ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांत इंटरनेट बँकिंगमुळे सामान्य लोकांचे जीवन सुकर झाले आहे.  बँकिंग सर्व्हिसेसशी संबंधित बरीचशी कामे घरबसल्या करता येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत आहे. मात्र असे जरी असले तरी इंटरनेट बँकिंगमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या समस्याही वेगाने वाढत आहेत.

ऑनलाइन फसवणूकीचे (Banking Fraud) प्रकार टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या अधिकृत साइटवर लिहिले आहे की, ग्राहकांनी बँकेच्या नावावर कोणत्याही ई-मेल व एसएमएसबाबत नेहमी सतर्क असले पाहिजे. एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर लिहिले आहे की, ‘एसबीआय, इतर वित्तीय संस्था आणि कोणतीही क्रेडिट कार्ड कंपनी ई-मेलद्वारे ग्राहकांच्या माहितीची पुष्टी करत नाही.’ ग्राहकांनी केवळ विश्वसनीय स्रोतद्वारे मिळालेल्या नंबरद्वारेच बँकेशी संपर्क साधावा.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास ताबडतोब खालील गोष्टी फॉलो करा आणि आपली मेहनतीची कमाई वाचवा –

आपल्या बँक खात्याशी संबंधित माहितीचा गैरवापर होत असल्याचे जेव्हा आपल्या लक्षात येते  तेव्हा लगेच पोलिसांना कळवा.

आपल्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला कॉल करा आणि त्यांना खाते किंवा कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

झालेल्या फसवणूकीबद्दल बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला माहिती द्या. आपण त्यांच्याकडून फ्रॉड अलर्ट सेट करण्यासाठी विनंती करा.

तसेच, आपला पासवर्ड डिजिटल प्वाइंटमधून  बदलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून  बँक खात्याचा किंवा क्रेडिट कार्डचा दुरुपयोग होऊ शकणार नाही.

फसवणूकीसंदर्भातील तक्रारीच्या वेळी आपल्याकडे मागील सहा महिन्यांतील स्टेटमेंट, एसएमएस किंवा फसवणूकीशी संबंधित ईमेलचीही एक प्रत असावी.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार फसवणूकीच्या प्रकरणाबद्दल बँकेने तीन दिवसांत अहवाल द्यावा.

असे केल्याने तुमचे नुकसान होणार नाही. जर आपण फसवणूकीच्या 7 दिवसांच्या आत माहिती दिली तर या प्रकरणातील नुकसानभरपाई  मर्यादित असेल.

आरबीआयच्या नियमांनुसार जर तुम्ही अशा कोणत्याही फसवणूकीची माहिती वेळेत बँकेला दिली असेल तर बँकेने तुमचे पैसे 10 दिवसांच्या आत बँक खात्यात ठेवले पाहिजेत. या विषयाशी संबंधित विवादही 90 दिवसांच्या आत निकाली काढावेत.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या