Beed Crime | फोटो काढण्याचा नाद बेतला जीवावर; 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  Beed Crime | दिवाळीच्या सुट्टीमध्ये आजोळी आलेल्या एका 17 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडूून दुर्दैवी मृत्यु (Died) झाल्याची धक्कादायक घटना (Beed Crime) घडली आहे. या मुलाचा अंबाजोगाईच्या नागनाथ मंदिराच्या धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. अमर अनिल राडकर (वय, 17 रा. जोडजवळा, जि. लातूर) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कुंटूबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

याबाबत माहिती अशी, अमर राडकर (Amar Radkar) हा दिवाळीच्या सुटीनिमित्त आजोळी आडस येथे आला होता.
काल (बुधवारी) दुपारी तो दर्शनासाठी 2 मावस भावांसह अंबाजोगाईच्या नागनाथ मंदिरात गेला.
त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान तिघेही मंदिर परिसरातील धबधब्याकडे फोटो काढण्यासाठी गेले. यावेळी अमर पाण्यात उतरला होता.
मात्र, खोलाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. याक्षणी त्याच्या भावांनी आरडाओरडा केली.
मात्र, आसपास कोणीही नसल्याने अमरला मदत मिळाली नाही.

 

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीसांनी (Ambajogai City Police) घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोध घेऊन रात्री 9 च्या दरम्यान अमरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात (Beed Crime) हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title : Beed Crime | 17 year old boy drowned while taking a photo in ambajogai of beed district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | औरंगाबादेत प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकरास लोणावळ्यात अटक

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव किंचीत वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Online Life Certificate | घरबसल्या ऑनलाइन जमा करू शकता हयातीचा दाखला, बँकिंग अलायन्स देतंय सुविधा