Beed Crime | दुर्देवी ! सेल्फीचा मोह बेतला जीवावर; नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | तालुक्यातील माजलगाव धरणाच्या पात्रात सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतल्याचे समोर आले (Beed Crime) आहे. एका नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू (Died) झाल्याची घटना 2 एप्रिलला घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ताहा सिद्दीकी पठाण (Taha Siddiqui Pathan) (वय, 20), सिद्दीकी इनायत पठाण (Siddiqui Inayat Pathan) (वय, 23, दोघे रा. डाकळगाव वडी, ता. अंबड, जि. जालना) व शादाब (Shadab) (वय, 22 रा.बिहार) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिद्दीकी आणि ताहा यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दोन दिवसांपूर्वी ताहा आपल्या पती आणि पतीचा मित्र शादाब यांच्या समवेत माहेरी कवडगाव येथे आली होती. त्यानंतर 2 एप्रिलला दुपारी तिघेही कवडगाव-तालखेड रस्त्यावरील (Kawadgaon-Tal Khed Road) माजलगाव धरणाच्या पात्रात फोटो सेशन साठी गेले होते. तेथे पोहोचल्यानंतर फोटो शूट साठी धरणातील एका बेटाचे त्यांनी ठिकाण निवडले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत ते बेटापर्यंत पोहोचले. यावेळी ताहाचा भाऊदेखील त्यांच्यासमवेत फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी होता. फोटोशूटला सुरुवात झाली. त्यानंतर अधिक चांगल्या प्रकारे फोटो येण्यासाठी तिघेही अधिक खोल पाण्यात गेले. त्याचवेळी ते बुडू लागल्याने ताहाच्या भावाने इतर तरूणांना बोलावले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. शर्थीचे प्रयत्न करूनही तिघांना वाचवण्यात यश आले नाही. (Beed Crime)

याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे
(API Anand Kangune), पोलीस हेडकाॅन्स्टेबल विठ्ठल गित्ते (Police Chief Constable Vitthal Gitte),
पोलीस नाईक विलास खरात (Vilas Kharat), महेश गर्जे (Mahesh Garje)
यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर मृतदेह वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.

 

रमजानवर दु:खाचे सावट..

रमजाननिमित्त काही दिवसांसाठी ताहा आपल्या पतीसमवेत माहेरी आली होती.
मात्र, सेल्फीच्या नादात तिच्यासह तिघांनी जीव गमवावा लागला. तिचे संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले असून या
घटनेमुळे शोककळा पसरली आहे. कवडगाव येथेच ताहा व सिद्दीकी या
दाम्पत्याचा दफनविधी करण्यात आला तर शादाबाचे नातेवाईक 3 रोजी
वडवणीत पोहोचले असून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
रमजान महिना नुकताच सुरु झाला होता. त्यातच ही घटना घडल्याने रमजानवर दु:खाचे सावट होते.

 

Web Title :- Beed Crime | Bad luck! Three drowned along with their newlyweds in beed


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rice Water Benefits For Skin | तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी ‘हे’ 5 फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील!

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किमतीत घसरण तर, चांदीही उतरली; जाणून घ्या नवीन भाव

Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान