Beed Crime News | शेतातील काम आटोपून घरी येत असताना मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपली दैनंदिन काम उरकून शेतातून घरी परतत असताना एका वृद्ध महिलेला आणि तिच्या म्हशीला एका मद्यधुंद कारचालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत ती वृद्ध महिला आणि तिची म्हैस जागीच ठार झाली. या घटनेनंतर मद्यधुंद कारचालक घटनास्थळावरून पळ काढत असताना त्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला पकडले व बेदम चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. (Beed Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रुक्मिणी शंकर गुंडाळ (वय 65) असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. काल सायंकाळच्या वेळी रुक्मिणी या आपल्या शेतातील दैनंदिन काम उरकून आपल्या म्हशीसह घरी परतत होत्या. यादरम्यान जीप क्रमांक MH 23 E 4628 या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. या अवस्थेमध्ये त्याने या महिलेला आणि तिच्या म्हशीला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या धडकेत रुक्मिणी आणि त्यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हा कार चालक घटनास्थळावरून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता.

 

यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने या कारचालकाचा पाठलाग केला आणि त्याला पकडून बेदम चोप दिला. यानंतर वडगाव पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली आणि त्या आरोपी कारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह केज रुग्णालयात पाठवला. अनिल पारड असे या मद्यधुंद आरोपी ड्रायव्हरचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची गाडीदेखील जप्त केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Beed Crime News)

 

मळणी यंत्रामध्ये महिलेची वेणी अडकल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गेवराई शिवारात वंदना दामोधर गिऱ्हे या महिलेचा मळणी यंत्रामध्ये वेणी अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. हरभऱ्याची मळणी करायची होती म्हणून वंदना गिऱ्हे या आपल्या कुटुंबासोबत शेतात गेल्या होत्या. हरभऱ्याची मळणी करण्यासाठी मळणी यंत्र चालू केले आणि वाळलेला हरभरा मळणी यंत्रात टाकण्यासाठी वंदना या वाकून मळणी यंत्रात पाहू लागल्या आणि याचदरम्यान मोठा घात झाला.
मळणी यंत्रात वाकून पाहात असताना वंदना यांची वेणी मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकली
आणि त्या मळणी यंत्रात ओढल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.
यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमर मोरे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

 

 

Web Title :- Beed Crime News | 65 year old woman was crushed to death by a jeep driver in beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा