Pune Crime News | मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या विमानतळ परिसरातील एॅटमॉस्फियर 6 हॉटेलवर ‘सासु’ची कारवाई, साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण (Noise Pollution) करणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell) कारवाई करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या विमानतळ परिसरातील एॅटमॉस्फियर 6 हॉटेलवर (Atmosphere 6) मंगळवारी (दि.14) रात्री कारवाई केली आहे. या कारवाई (Pune Crime) पोलिसांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले आहे.

 

आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. विमानतळ परिसरातील लुंकड स्कायमॅक्स मॉल मधील सहाव्या मजल्यावर असलेल्या एॅटमॉस्फियर 6 हॉटेल मध्ये रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टीम सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले. तसेच या हॉटेलवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्फे,
तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | ‘Sasu’ action on Atmosphere 6 hotel in airport area for playing loud music, sound system, DJ mixer seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या