खासदार बारणे-आमदार जगताप यांच्यात शाब्दिक युद्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळुन खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचीत त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावाशी झालेल्या जगतापांनी दुस-या विषयी बोलणे हा मोठा ‘जोक’ आहे. पालिकेतील अनागोंधी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. अतिक्रमण आणि खाबूगिरीवर आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून वैयक्तीक टीका केली आहे. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही. तसेच थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.23) आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याबरोबर बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती. गेल्या वर्षभरात या प्रश्नाबाबत एकदाही तोंड न उघडणा-या पिंपरी-चिंचवड शहराचे भाजपचे नेतृत्व करणारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्वरीत दुस-या दिवशी मूळ प्रश्नांना बगल देऊन स्वभावानुसार बारणे यांच्यावर वैयक्तीक टीका केली होती. त्याला आज सोमवारी (दि.27) खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड आणि आक्रमकपणे उत्तर दिले.

पुणे : कोणी नगरसेवक शोधून देतयं का नगरसेवक

खासदार बारणे म्हणाले, मी सर्वसामान्य मानसांमध्ये मिसळतो. त्यामुळे नागरीकांनी केलेल्या तक्रारी, जनमानसाच्या समस्या लोकाप्रतीनिधी म्हणून अधिका-यांपुढे मांडणे माझे कर्तव्य आहे. त्यातून मी महापालिका आयुक्त व अधिका-यांसमवेत बैठक घेऊन शहरातील समस्या मांडल्या होत्या. राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपला सत्ता राबवयाला दिली आहे. ती उबवायला नाही ? तुम्ही तर सत्तेचा बाजार चालवला असून भ्रष्टाचार आणि ‘खाबूगिरी’ यातच तुम्ही गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर तुम्हाला पडलेला आहे. केवळ आकसापोटी टीका करण्यात तुम्ही धन्यता मानता या तुमच्या कार्यास आमच्या लाख लाख शुभेच्छा अशी परखड प्रतिक्रिया बारणे यांनी दिली.

बारणे म्हणाले, मी केंद्राच्या योजनासाठी काय पाठपुरावा केला हे भाजपच्या मंत्र्यांना विचारा तेच तुम्हाला सांगतील. विधानसभा सोडून महापालिकेच्या कारभारातच रमण्यात अधिक धन्यता तुम्ही मानत असल्याने तुम्हांला शहरावासियांच्या व्यथा काय कळणार? निवडणुकांना मी घाबरत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर व लोक संपर्काच्या बळावर येणा-या लोकसभेला उभा राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीत खोटी आश्वासने व गाजर दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. माझ्या कर्तुत्वाच्या जोरावर मतदारांच्या आशीर्वादाने मी 2019 ला पुन्हा खासदार होणार आहे. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही. त्याची काळजी जगताप यांनी करू नये, असा सल्ला ही बारणे यांनी दिला.

गेल्या दीड वर्षात शहरातील प्रश्ना बाबत आलेल अपयश, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप, नियोजन शुन्य कारभार, हप्ते वसूली, शहराच्या रस्त्यांवर आलेले बकाल पणाचे स्वरूप, ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भरल्या जाणा-या निविदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आरोप करून सत्ता मिळवूनही एकही आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे मानसीक संतुलन बिघडल्याने व रोज होत असलेल्या आरोपाने बेजार झालेल्या जगतापांनी मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी जुनाच फंडा अवलंबला असून ते व्यक्तीगत आरोप करीत आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83f7765d-a9f3-11e8-a696-b77ffc250dfb’]

राष्ट्रवादी पक्षाच्या काळातील भ्रष्टाचारावर निवडणुकीत बोलणारे बोलघेवडे सत्ता मिळाल्यावर भ्रष्टाचारात न्हाउन निघाले असल्याने पिंपरी-चिंचवड शहर समस्यांचे माहेर घर झाले आहे. पाणी, कचरा, वाहतुकीची समस्या, शास्तीकर, रस्त्यावरील अतिक्रमणे, अनाधिकृत टप-या, गुंडगिरी दहशत, नागरीकांच्या गाड्यांची फोडतोड या सर्व समस्यांनी शहरातील नागरीक पुर्ण हैराण झाले आहेत.

थेरगांवविषयी कायमच मनात आकस बाळगणा-या जगतापांना थेरगावच्या विकासात रस नसून दृष्टीहीन नेतृत्व असल्याने थेरगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बोट कल्ब उद्यान, स्विमींग पुल गार्डन, हॉस्पीटल, वेंगेसरकर अँकाडमी, प्रशस्त शाळांच्या इमारती या सारखे प्रकल्प दिसत नाही. म्हणुनच ते टीका करीत आहेत. त्यांच्या थेरगांव वरील टीकेला थेरगावचा नागरीक भिक घालणार नाही. यावर नागरिकांच्या व्यथा मांडल्या म्हणून खासदारांनी महापालिकेत लक्ष घालू नये? जशी का महापालिका यांना जहागिरी म्हणून मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मिळालेल्या पारितोषकांचा दीड वर्षात बोजवारा उडला असून शहराच्या विकासाचा दर्जा घटला आहे. याची जबाबदारी ही नेतृत्व गुण नसणा-या जगताप यांचीच आहे. पाणी प्रश्न गंभीर करून विशिष्ट भागातील बांधकाम परवानगी रोखायची. त्यातुन बिल्डर्स लॉबीला वेटीस धरण्याचा उद्योग करायचा आणी सत्तेतून पैसा पैशातुन सत्ता हा उद्योग पिंपरी-चिंचवडच्या नागरीकांनी चांगलाच ओळखला आहे. म्हणुनच आत्ता शहरातील नागरीक खासगीत बोलू लागले आहेत. यांच्या पेक्षा पहिले बरे परंतु, त्यावेळी राष्ट्रवादी मध्ये कर्ता करवते हेच होते, फक्त झेंडे बदलेले गुण मात्र तेच आहेत, असे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.