Benefits Of Tulsi | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी हिवाळ्यात तुळशीचे सेवन होऊ शकते परिणामकारक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Tulsi | भरपूर औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीचे सेवन हिवाळ्यात खूप गुणकारी आहे. तुळशीमुळे इम्युनिटी (Immunity) वाढते, जी कोरोनाच्या काळात खूप महत्त्वाची आहे. हिवाळ्यात आपली इम्युनिटी खूप कमकुवत होते, अशा स्थितीत तुळशीचे सेवन केल्यास सर्दी, खोकला, कफ यासारख्या आजारांपासून आराम मिळतो. (Benefits Of Tulsi)

 

तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन (Vitamin) आणि खनिजे असतात. तसेच व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक आणि आयर्न देखील असते, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. वेबएमडी न्यूजनुसार, तुळशीचा चहा, काढा बनवून वापर करता येतो.

 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने (Ministry of Ayush) तुळशीचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप यावर तुळशीचा काढा (Tulsi Kadha) उत्तम उपाय आहे. कोरोनाच्या काळात दररोज 5-6 तुळशीची पाने खाणे खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. तुळशीचे सेवन आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेवूयात.

 

तुळशीचे आरोग्यादायी फायदे (Benefits Of Tulsi)

 

1. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते :
तुळशीचे सेवन केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहते.

2. इम्युनिटी मजबूत राहते :
कोरोनाच्या काळात मजबूत इम्युनिटी असणे अत्यंत आवश्यक आहे. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी तुळशीचे सेवन करणे खूप प्रभावी आहे. दिवसातून एकदा तुळशीचा चहा घेतल्यास हिवाळ्यातील आजारांपासून सुरक्षित राहू शकतो.

 

3. शुगर नियंत्रित करते :
तुळशीचे सेवन साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे सेवन केल्यास दिवसभर साखर नियंत्रणात राहते. (Benefits Of Tulsi)

 

4. पचन व्यवस्थित होते :
तुळशी केवळ हंगामी आजारांवर उपचार करत नाही तर पचनक्रियाही चांगली ठेवते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

 

5. व्हायरलपासून संरक्षण :
कोरोनाच्या काळात व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, त्यामध्ये तुळशीचे सेवन खूप उपयुक्त आहे. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुळशीचा काढा बनवून सेवन करू शकता.

 

Web Title :- Benefits Of Tulsi | omicron virus amazing health benefits of tulsi it can help to improve Immunity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League – PBCL | पहिली ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! प्रतापगड वॉरीयर्स, पन्हाळा पँथर्स संघांचा विजयाचा डबल धमाका

Chitra Wagh | आशिष शेलारांना धमकी मिळाल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये’

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्याचे 5 सुपर स्टॉक ! एकाने दिला 90% रिटर्न तर उर्वरित 70 टक्केपक्षा जास्त वाढले