हिरव्या भाज्यांसोबत पिवळी फळं आणि भाज्या खाल्ल्या तर औषध घेण्याचीही गरज पडणार नाही !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हिरव्या भाज्या आणि फळांचे फायदे तुम्हाला माहितच आहे. परंतु पिवळी फळं आणि भाज्याही शरीरासाठी खूप चांगल्या असतात. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेलाही फायदा होतो.

पिवळी फळं आणि भाज्या खाल्ल्यानं वजन मेंटेन राहतं. त्वचेवरील वयवाढीच्या खुणा निघून जातात आणि त्वचा दीर्घकाळ तरूण रहाते. यात बायोफ्लेनॉईड म्हणजेच व्हिटॅमिन पी जास्त असतं. यामुळं शरीरातील कोलोजनचं प्रमाण कंट्रोलमध्ये रहातं. कोणत्या पिवळ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा याची माहिती घेऊयात.

1) पिवळी शिमला मिरची – यात व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. यानं त्वचा चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तदाबाच्या समस्याही दूर होतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. यात फॉलेट्स, आयर्न भरपूर प्रमाणात असतं. यातील अँटी-आँक्सिडंट्समुळं शरीराला खूप फायदा होतो.

2) केळी – वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. याच्या सेवनानं निरोगी पद्धतीनं वजन वाढतं. हे फळ स्वस्त आणि पचायलाही सोपं असतं.

3) अननस – शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.