काय सांगता ! होय, बाजारात आली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी मिठाई

पोलिसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी मिठाई आली आहे. या मिठाइचे नाव ‘इम्युनिटी संदेश’ असे आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. गायीचे दूध, मध, हळद, तुळसी, केसर आणि वेलची यासारख्या 15 विविध गोष्टींची मिळून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.

कोलकाता येथील मिठाई दुकानदार सुदीप मलिक म्हणाले की, या मिठाईचे नाव ‘इम्युनिटी संदेश’ असं ठेवण्यात आलं असून 15 विविध गोष्टींपासून ही तयार करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास या मिठाईचा उपयोग होऊ शकतो. या मिठाईमध्ये साखरेऐवजी हिमालयातू आणलेल्या मधाचा वापर केला आहे. अन्य एक दुकानदार बलराम मलिक म्हणाले की, ‘ ही मिठाई व्हायरसचा अँटीडोट नाही. पण ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. ती वाढवण्याचे काम मिठाई करते.’ मिट्टी दोयी आणि रसगुल्लाप्रमाणेच संदेश मिठाई बंगालच्या परंपरागत मिठाई आहे.

येथील दुकानदारांनी असा दावा केला आहे की, कोलकातासहत पश्चिम बंगालमध्ये वाढणार्‍या कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारकशक्ती चांगली असावी लागते. ही रोग प्रतिकारकशक्ती या मिठाईतून वाढतेय. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र, बंगालसह सात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे.