खरचं ! ‘या’ कंपनीच्या मालकानं कर्मचार्‍यांच्या पगारात केली चक्‍क 7 लाखांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकाला कायमच अपेक्षा असते की आपल्या पगारात वाढ व्हावी. पगाराच्या आकड्यामागे एक शून्य वाढावा. परंतू भारतात एवढ्या पगाराची अपेक्षा करणं म्हणजे स्वत:चा अपेक्षा भंग. परंतू अमेरिकेतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एवढा पगार मिळतो की त्याचे आकडे तुम्ही ऐकलात तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

अमेरिकेतील डॅन प्राइस या व्यक्तीच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतका पगार वाढवून मिळाला आहे की तुम्ही कल्पना देखील करु शकणार नाहीत. अमेरिकेच्या Idaho मध्ये ग्रॅव्हिटी पेमेंट्स नावाची एक कंपनी आहे, याचे सीईओ आहेत डॅन. डॅनने त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 10 हजार डॉलर एवढी वाढ केली आहे. म्हणजेच 7,10,622 रुपये. पडलात ना चाट. कंपनीतील सर्वात कमी पगार असलेला कर्मचारी वर्षाला 28,42,488 रुपये कमावतो.

एवढेच नाही तर ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 वर्षात 49,74,354 रुपयांनी वाढ करणार आहे. हे त्यांचे लक्ष आहे. या कंपनीचे काम आहे क्रेडिटकार्ड प्रोसेसिंग करणं. या कंपनीने नुकतीच chargeitpro नावाची कंपनी घेतली. नवे ऑफिस खरेदी केले. डॅन प्राइसने स्वत:च्या पगारात 80 ते 90 टक्क्यांनी कपात केली. त्यानंतर त्यांनी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना 70 हजार डॉलरची घोषणा केली. ते म्हणाले की मी समस्यांचा भागीदार झालो आहे आता मला समाधानाचा भागीदार व्हायचे आहे. आधी मी दरवर्षाला 1 मिलियन डॉलरची कमाई करत होतो, तर माझे कर्मचारी केवळ 30 हजार डॉलरची कमाई करत होते.

Visit : policenama.com