दात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का ? करा ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काहींना अचानक अशी समस्या येते की, दात कमजोर होतात आणि हलू लागतात. वाढत्या वयात ही चिंता जास्त जाणवते. हिरड्यांची समस्याही दातांच्या हलण्याचं कारण असू शकते. याशिवाय पॅरियोडोंटम नावाच्या आजारानंही दात कमजोर होतात. दातांच्या आजूबाजूचे टिशू सैल होतात त्यामुळं दात हलू लागतात.

दात हलत असतील तर अनेकांना टणक किंवा कडक पदार्थ खण्याची भीती वाटते. अशात दात तुटूही शकतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे घरगुती सोपे उपाय जाणून घेणार आहोत. यामुळं तुम्ही दातांच्या दातांच्या समस्या दूर करू शकता.

1) मीठ आणि मोहरीचं तेल – मीठ आणि मोहरीचं तेल यामुळं दात सैल होण्याची किंवा दात हलण्याची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी थोडं मीठ घ्या त्यात मोहरीचं तेल टाका. यानं दात स्वच्छ करा. आयुर्वेदातही मीठ दातांच्या आरोग्यासठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. मीठात अँटीसेप्टीक गुण असतात. तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्याही करू शकता. यामुळं हिरड्यांची सूज येण्याची समस्याही दूर होते.

2) काळे मिरे आणि हळद – काळे मिरे आणि हळद यांचा वापर करून तुम्ही दातांमधील बॅक्टेरिया दूर करू शकता. यामुळं हिरड्याही मजबूत होतात. यासाठी काळे मिरे आणि हळद असे दोन्हीही पदार्थ समप्रमाणात घ्या. आता हे दातांवर लावा आणि मसाज करा. यामुळंही दात हलण्याची समस्या दूर होते.

3) हिरव्या भाज्यांचं सेवन – निरोगी राहण्याचा पहिला मंत्र आहे तो म्हणजे योग्य संतुलित आहार. आहारात जेवढं शक्य असेल तेवढं हिरव्या भाज्यांचं सेवन करावं. हिरव्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात. यामुळं इम्युन सिस्टीम मजबूत होते. याशिवाय हिरव्या भाज्यांच्या सेवनानं इंफेक्शनदेखील होत नाही. यामुळं दातांची मुळं मजबूत होतात. लहान मुलांनाही अनेकदा दात हलण्याची समस्या येते. त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता.

4) अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा – जर तुम्ही जास्त प्रमाणात अॅसिडयुक्त पदार्थांचं किंवा पेयांचं सेवन करत असाल तर तुम्हाला दात हलण्याची समस्या येऊ शकते. त्यामुळं अशा पदार्थांचं किंवा पेयांचं सेवन करू नका. सॉफ्ट ड्रिंक, सोडा, कोल्डड्रिंक अशा पदार्थांचंही सेवन बंद करायला हवं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.