1 कोटी पेक्षा जास्त मोबाईल आहे ‘हे’ बोगस App, तुमच्या फोनमधील ‘तात्काळ’ काढा, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगल प्ले स्टोअरवर एक बनावट अ‍ॅप अस्तित्वात आहे, जे की सॅमसंग च्या १ कोटीपेक्षा जास्त मोबाइलमध्ये चुकून डाउनलोड झाले आहे. स्मार्टफोन वापरणारे सामान्यत: गुगल प्ले स्टोअर वरून अ‍ॅप डाउनलोड करत असतात. गूगल प्ले स्टोअरवर हजारो अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, पण त्यात काही अ‍ॅप असेही आहेत जे की तुमच्या फोनमध्ये येऊन तुमचा डेटा आणि बँकेचा तपशील चोरू शकतात.

जाणूनबुजून असे काही बनावट अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाउनलोड केले जातात. हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमधील स्टोअर डेटा चोरी करतो आणि सायबर तज्ञाकडे देतो. यामुळे आपल्या बँकेची संपूर्ण माहिती सायबर क्राइम तज्ञाकडे पोहोचू शकते, ज्यामुळे आपले पैसे चोरी होऊ शकतात. याशिवाय या बनावट अ‍ॅपला तुमची इतर महत्वाची माहितीही मिळते.

एका वृत्ताच्या रिपोर्टनुसार, १ कोटीपेक्षा जास्त मोबाइलमध्ये हे अ‍ॅप इंस्टाल झाले असून ते कधीही ऑनलाइन फ्रॉड करून आपल्या बँकेतील पैसे उडवू शकतात. या बनावट अ‍ॅपपासून आपल्याला सतर्क राहणे गरजेचे आहे कारण यापासून आपल्याला फसवले जाऊ शकते. याबाबतीत अलीकडेच विविध बँकांकडूनही इशारे ही देण्यात आले होते. बँकांच्या वतीने असे सांगितले जात होते की काही बनावट बँकिंग अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर खातेधारकांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते.

हे बनावट अ‍ॅप १ कोटीहून अधिक मोबाईलमध्ये आहे
एका वृत्ताच्या रिपोर्टनुसार या बनावट अ‍ॅपचे नाव ”Updates for Samsung” असे आहे. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. लोक या अ‍ॅपला सॅमसंग द्वारे डिझाइन केलेले मूळ अ‍ॅप समजून इंस्टॉल करत असतात.

संरक्षण कसे करावे
रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की हे अ‍ॅप जाहिरात दाखवण्याबरोबरच वापरकर्त्यांना ३४.९९ डॉलर (सुमारे २,४५० रुपये) मध्ये सॅमसंगचे फर्मवेअर डाऊनलोड करण्याचा पर्याय देत असते. पेमेंटसाठी अ‍ॅपमधील गुगल प्ले सबस्क्रिप्शन मध्ये बिलिंगऐवजी क्रेडिट कार्डच्या तपशीलांची मागणी केली जाते. अ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर येणारे मुख्य कॉन्टेंट updato.com नावाच्या ब्लॉगिंग वेबसाइटवर रेंडर करून येत असते.

जर आपल्याला या धोक्यापासून बचाव करायचा असेल तर आपल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप असल्यास ते त्वरित अनइंस्टॉल करा. अनइंस्टॉल केल्यानंतर डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करावे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/