भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

इंदूर : वृत्तसंस्था – भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. भैय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या घटने नंतर अनेक तर्कविर्तक काढले जात होते. पण, आता मोठा खुलासा करत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भैय्यू महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी औषधांच्या नशेत सुसाईट नोट लिहिली होती.  असे इंदूरचे एसएसपी रुचिवर्धन मिश्र यांनी सांगितले.

भैय्यू महाराज यांचे सेवक असणारे विनायक व शरद हे त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात फसविण्यासाठी धमकी देत होते.  शेवटी या धमकीला कंटाळून भैय्यू महाराज यांनी आत्महत्या केली होती.  हे आता समोर आले आहे.  अशी माहिती इंदूरचे एसएसपी रुचिवर्धन मिश्र यांनी दिली. या प्रकरणातील आरोपींकडून ब्लॅक चेक जप्त करण्यात आले असून, न्यायालयात हे पुरावे महत्वाचे ठरणार आहेत. भैय्यू महाराज यांची संपत्ती हडप करण्याचा व संस्थेवर ताबा मिळवण्याची या दोघांची योजना होती. शेवटी भैय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले की, या संपत्तीची जबाबदारी ही विनायक याची राहिल.

आत्महत्येपूर्वी भैय्यू महाराज गेल्या काही दिवसांपासून नैराश्याच्या अवस्थेत होते. अशी माहिती मिळाली होती. त्यांनी निराशेतूनच आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतू ही माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली आहे.

मॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरु असा त्यांचा प्रवासाचा आलेख होता,  सर्व पक्षातील राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबध होते. तसेच त्यांनी विविध आंदोलनात मध्यस्त्याची भूमिका देखील त्यांनी निभावली होती. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली होती, त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतू उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला.

Loading...
You might also like