Airtel च्या 3 स्वस्त योजना ‘लॉन्च’, डेटा आणि कॉलिंगसह ‘हे’ फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारती एअरटेलने तीन नवीन प्रीपेड योजना सुरू केल्या आहेत. त्यांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते निवडक मंडळांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये ग्राहकांना 28 दिवसांपेक्षा कमी कालावधीची वैधता मिळते. या योजना एअरटेलच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहेत. या योजनांची किंमत 99 रुपयांपासून ते 199 रुपयांपर्यंत आहे. हे सर्व डेटा प्लॅन आहेत, ज्यात हॅलो ट्यून्स, विन्क म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम सबस्क्रिप्शन बेनिफिट्ससह अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे.

कंपनीच्या 99 आणि 129 रुपयांच्या योजनेत 1GB डेटासह अमर्यादित कॉल्स मिळतील. त्याचबरोबर 199 रुपयांच्या योजनेत दररोज 1GB डेटा तसेच अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातील.

एअरटेलच्या 99 रुपयांच्या प्रीपेड योजनेची वैधता 18 दिवसांची आहे आणि 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. ही योजना कोलकाता, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, राजस्थान, ओडिशा, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीच्या 129 रुपयांच्या योजनेची वैधता 24 दिवसांची असून वापरकर्त्यांना 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतील. ही योजना आसाम, बिहार आणि झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, केरळ, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश ईस्ट, उत्तर प्रदेश वेस्ट, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

199 रुपयांच्या योजनेबद्दल बघितले तर त्याची वैधता 24 दिवसांची आहे. यात दररोज 1 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. ही योजना आसाम, बिहार आणि झारखंड, गुजरात, हरियाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश ईस्ट, उत्तर प्रदेश वेस्ट, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.