कधीकाळी आई करायची घरकाम, आज ‘ही’ अभिनेत्री कोट्यावधीची मालकीण ! ‘असा’ सुरू झाला अभिनयाचा प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉमेडियन भारती सिंह टीव्ही इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. परंतु यासाठी तिला खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला आहे. एका मुलाखतीत भारतीनं याबद्दल खुलासा केला आहे.

भारती म्हणाली, “मी 2 वर्षांची होते जेव्हा माझे वडिल वारले. आम्ही 3 भाऊ, बहिण होतो. आमच्या आईनं खूप कष्ट केले आणि आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. आमची आर्थिक स्थिती खूप नाजूक होती. आई दुसऱ्यांकडे जेवण बनवायला जात असे. कधी कधी मी देखील तिच्यासोबत जात असे. इतरांच्या घरात किचन, फ्रीज पाहिल्यानंतर मला वाटायचं असं घर आपलं कधी असणार. आपल्याही घरात या वस्तू कधी येणार. या आठवणींचा विचार केला तर आजही त्रास होतो.”

भारतीनं पुढे सांगितलं, “कॉलेजात असताना मी मैत्रिणींसोबत मजा मस्ती करत होते. सुदेश लहरी तिथून जात होते. त्यांनी मला पाहिलं. मी कॉमेडी ड्रामात काम करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी काही ओळी मला बोलायला सांगितल्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीनं त्या घेतल्या. त्यांनी मला कॉमेडी ड्रामाचा भाग व्हायला सांगितलं. मी आधी नकार दिला. परंतु मी जर यात भाग घेतला तर माझी फी माफ होईल असं टीचरनं मला सांगितलं. ते म्हणाले काहीही करून सुदेश यांना तू कार्यक्रमात हवी आहेस. नंतर मी कार्यक्रमासाठी होकार दिला. अशा प्रकारे माझा अभिनय प्रवास सुरू झाला.