भीमा कोरेगाव : जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा, म्हणाले – ‘त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव प्रकरण घडून 2 वर्ष झाली. आता यावर प्रकरणातील तपासावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात नवे सरकार आल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारवर भीमा कोरेगाव प्रकरणावरुन टीका होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात कालच म्हणजे 24 जानेवारी 2020 ला भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. यावर मंत्री जयंत पाटलांनी बोलताना प्रकाश आंबडेकरांवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटलांनी सांगलीत पत्रकरांशी बोलताना वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. आंबेडकरांवर आरोप करताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचण्याचा प्रयत्न केला आहे.

जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांवर आरोप केला की प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष देताना संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांचे नाव घेतले नाही. त्यांनी त्यांचे नाव का घेण्याचे टाळले असा सवाल जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना केला.

भीमा कोरेगाव प्रकरणी दंगल झाल्यानंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की त्यांनी ही दंगल घडवली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे तसेच यातील इतर सहभागी असलेल्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.

फेसबुक पेज लाईक करा –