Video : ’हेलो कौन’ नंतर रितेश पांडेच्या नव्या रॅप साँगची धमाल, फॅन्सचा जबरदस्त प्रतिसाद

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भोजपुरी फिल्म-म्युजिक इंडस्ट्रीमध्ये पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यासोबत सिंगर-अ‍ॅक्टर रितेश पांडेने सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी सुपरस्टार रितेश पांडेच्या फॅन्सची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. रितेश पांडेचे पाहिले रॅप साँग ’हेलो कौन’ने अगोदरच सर्व रेकॉर्ड मोडलेले असतानाच, आता त्याचे आणखी एक रॅप साँग रिलीज होताच वायरल झाले आहे.

रितेश पांडेचे पहिले रॅप साँग ’हेलो कौन’ ला यू-ट्यूबवर 62 कोटी व्ह्यूज मिळाले, ज्यासोबतच हे गाणे भोजपुरी इंडस्ट्रीचे सर्वात जास्त वेळा पाहिलेले गाणे ठरले आहे. आता त्याचे आणखी एक रॅप साँग ’कौन था’ रिलीज झाले आहे. हे गाणे मागच्या 17 सप्टेंबरला रिलीज झाले आणि या गाण्याची लोकप्रियता अशी वाढली की दोन दिवसांच्या आतच ते 2.4 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले.

रितेशच्या हे रॅप साँग रिद्धि म्यूजिक वर्ल्डच्या ऑफिशियल यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे आणि ते आतापर्यंत 2,404,148 वेळा पाहिले गेले आहे. तर, या गाण्याला आतापर्यंत 31 हजार लाइक्स सुद्धा मिळाले आहेत. रॅप साँग ’कौन था’चे बोल विशाल भारती यांनी लिहिले आहे, तर म्युझिक गोलू गगनने दिले आहे.

सोशल मीडियावर रितेश पांडेचे हे गाणे, ’गोरकी पतरकी रे मारे गुलेलवा जियरा उडी उडी जाए’ वायरल होत आहे. यापूर्वी हे गाणे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायले आहे. आता हे गाणे रितेश पांडेने नव्या ढंगात सादर केले आहे. हे गाणे रितेश पांडे आणि अंतरा सिंह प्रियंका यांनी मिळून गायले आहे. गाण्याला यू-ट्यूबवर रिलीज होण्यापूर्वी अवघ्या 24 दिवसांच्या आत 55 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. रितेश पांडे या गाण्यात रॅप करताना सुद्धा दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like