दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये अभिनेत्री रानी चटर्जी, म्हणाली – ‘आता हिंमत राहिली नाही, आत्महत्या करते’ !

पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोशुटमुळं ती चर्चेत आली होती. नुकतीच रानीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून तिनं चकित करणारा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, दीर्घकाळापासून ती डिप्रेशनमध्ये आहे. आता हिंमत नाही राहिली. तिनं आत्महत्या करण्याचंही बोललं आहे. यासाठी जबाबदार कोण आहे ते नावही तिनं सांगितलं आहे.

रानीनं इंस्टावरून मंगळवारी एक पोस्ट शेअर केली आहे. यात रानीनं लिहिलंय की, “मी नेहमीच पॉझिटिव्ह राहण्याबद्दल आणि स्ट्राँग राहण्याबद्दल सांगत असते परंतु मी आता खूप डिस्टर्ब झाले आहे. आता मला जास्त सहन होत नाही. हा माणूस अनेक वर्षांपासून फेसुबकवर माझ्याबद्दल वाईटसाईट लिहित आहे. मी इग्रोर करण्याचा खूप प्रयत्न केला. अनेकांसोबत बोलले त्यांनीही मला हे सांगितलं की, इग्नोर कर. मी पण शेवटी माणूस आहे. मी लठ्ठ आहे, म्हातारी आहे किंवा काहीही काम करो परंतु हा माणूस एवढं वाईट लिहितो की, लोक मला सर्व पाठवतात आणि म्हणतात इग्नोर कर. आत नाही होऊ शकत इग्नोर.”

रानीनं पुढं लिहिलं की, “मी अनेक वर्षांपासून या सगळ्यामुळं परेशान आहे. मानसिक तणावात आहे. याची बहुतेक अशी इच्छा आहे की, आत्महत्या करावी. याच्यामुळं माझ्या खासगी आयुष्यात खूप तणावात आहे. #MumbaiPolice यांना माझी विनंती आहे की, जर मी काही केलं तर याला जबाबदार तो व्यक्ति म्हणजेच धनंजय सिंह असेल. मी सायबर सेलकडेही याची तक्रार केली आहे. परंतु त्यांनी मला सांगितलं की, त्या व्यक्तीनं तुमचं नाव लिहिलेलं नाही.” रानीनं त्याचं नाव धननज्य सिंह असं लिहलं आहे.

View this post on Instagram

@mumbaipolice 🙏🙏🙏😭😭😭😭😭 give up

A post shared by Rani Chatterjee Official (@ranichatterjeeofficial) on

रानी असंही म्हणाली, मला खात्री आहे की, तो माणूस माझ्यासाठीच लिहित आहे. पोस्टमध्ये जरी माझं नाव नसलं तरी लोक त्याच्या या पोस्टवर माझं नाव घेऊ घाण शिव्या देतात आणि हा माणूस मजा घेतो. मी आता हताश झाले आहे. माझ्यात आता हिंमत राहिलेली नाही. आता मी आत्महत्या करते कारण मी खूप वाईट पद्धतीनं डिप्रेशनमधून जात आहे. तेही या व्यक्तिमुळं आणि आज नाही तर अनेक वर्षांपासून. आता आणखी जास्त सहन होत नाही.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like