CM शिवराज यांच्या 2 मोठ्या घोषणा ! थकीत वीज बिल केले माफ, NEET-JEE होईल ठरलेल्या वेळी

भोपाळ : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाच्या दरम्यान आता मध्य प्रदेश सरकारने दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यातील लोकांना दिलासा देत थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, आता लोकांना थकीत वीज बिलासाठी अस्वस्थ होण्याची गरज नाही. सरकार ते पूर्णपणे माफ करत आहे. मात्र, यासोबत त्यांनी म्हटले की, आता लोकांना येत्या काळात एकाच महिन्याचे वीज बिल भरावे लागणार आहे. तर नीट आणि जेईई बाबत त्यांनी म्हटले की, या दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळी होतील. चौहान म्हणाले, मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे अणि याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

नीट आणि जेईई परीक्षेवरून वाद
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, या बैठकीत नीट आणि जेईई परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात पुर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर नीट आणि जेईई परीक्षेचे आयोजन स्थगित करणे आणि 17 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात फेटाळलेल्या याचिकेवर पुर्विचार याचिकेसाठी सहा राज्यांनी न्यायालयात आव्हान आहे. या राज्यांमध्ये पंजाब, झारखण्ड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशला मिळणार आहे मोठी भेट
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्यप्रदेशला नवी भेट देणार आहेत. पंतप्रधान स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेची सुरूवात येथून करणार आहेत. पीएम याच्या वितरणाची सुरूवात मध्य प्रदेशातून करतील. हा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये होईल. यामध्ये स्वत: पीएम मोदी सहभागी होती. मध्यप्रदेश या योजनेत संपूर्ण देशात नंबर एकवर आहे. नागरी विकास आणि निवास मंत्री भूपेन्द्र सिंह यांनी याबाबत तयारीसाठी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यांनी बपर्वाई केल्याने नगरपालिका कैलारस आणि पाथरियाच्या मुख्याधिकार्‍यांना सस्पेंड सुद्धा केले. पीएम स्वनिधी योजनेत 31 ऑगस्टपर्यंत एक लाख स्ट्रीट वेंडर्सच्य केस मंजूर करण्याचे लक्ष्य आहे.