…भूतानमध्ये जेव्हा PM नरेंद्र मोदींच्या समोर आले आणखी एक मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर होते. भूतानमध्ये माेदींचे जाेरदार स्वागत करण्यात आले. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान माेदींच्या समाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ मोदींनी देखील शेअर केला आहे. मोदी भूतानच्या विमानतळावर पोहचताच भूतानचे पंतप्रधान लाेटे शेरिंग त्यांच्या स्वागतासाठी आले होते.

भूतानच्या सैन्य दलाने मानवंदना देत मोदींचे स्वागत केले. विमानतळावरून निघाल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लोक भारताचा आणि भूतानचा झेंडा घेऊन मोदींचे स्वागत करत होते.

यावेळी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदींच्या जीवनकथेबाबत एक छोटे स्किट सादर करण्यात आले. भूतानमधील छोट्या मुलांनी सादर केलेल्या मोदींच्या जीवन प्रवासाबाबतच्या नाटकात चक्क खऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या बालपणीच्या आठवणी नाटक रूपातून समोर पाहिल्या. नाटकाच्या शेवटी तर मोदींसारखे दिसणारे पात्रच मोदींसमोर आले.

या दौऱ्यादरम्यान भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये ९ गोष्टीबाबत करार झाले. पंतप्रधान मोदींनी या दरम्यान रूपे कार्डचे लॉन्चिंग सुद्धा केले. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पहिला विदेश दौरा भूतानचाच केला होता. आणि यावेळीही मोदींनी पहिला विदेश दौरा भूतान या देशाचाच केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like