SSR Death Case : दिपेश सावंत आणि सिध्दार्थ पिठानी माफीचे साक्षीदार होणार ?

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अडीच महिन्यापूर्वी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरु असून रोज नवनवीन माहिती उघडकीस घेत आहे. आतापर्यंत सीबीआयकडून ७ जणांची चौकशी करण्यात आली आहे. अशातच सुशांतचा केअर टेकर दिपेश सावंत आणि सिद्धार्थ पिठानी माफीचे साक्षीदार होण्यास तयार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

सीबीआयच्या तपासात सुशांतचा केअर टेकर दिपेश सावंत हा महत्वाची व्यक्ती मानलं जात आहे. तर सिद्धार्थ हा सुशांतच्या रूमपार्टनर होता. दोघांनी सुद्धा सीबीआय तपासाबाबत महत्वाची माहिती दिली असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच तपास कार्यात त्यांची मदत होऊ शकते. यामुळेच ते माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सांगितलं जात आहे.

सुशांत आणि रियामध्ये ८ जून रोजी भांडण झालं होते. नंतर रियाने ८ हार्ड ड्राइव्ह नष्ट केल्या आणि ती घरातून निघून गेल्याचं, दिपेश आणि सिद्धार्थाने सांगितलं आहे. ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केलेली त्या दिवशी दिपेश आणि सिद्धार्थ घरातच होते. तसेच सुशांतच्या मृत्यूनंतर दिपेश काही काळ गायब होता. ईडीने त्याला समन्स देखील बजावलेले.

दरम्यान, याआधी दिपेशची मुंबई पोलिसांनी तीन वेळा आणि ईडीने दोन वेळा चौकशी केली. आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. सध्या सीबीआय थांबलेल्या DRDO गेस्ट हाऊसमध्ये दिपेश असून त्याला बाहेर पडल्यास मनाई केलेली आहे.