(BSF) सीमा सुरक्षा दलात मध्ये मोठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये मोठी भरती होणार आहे. बीएसएफमध्ये १०७२ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबलमधील रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिकसाठी हे अर्ज मागवण्यात आले असून दहावी, बारावी उत्तीर्णसोबतच आयटीआय आणि संबंधित क्षेत्रात काम केल्याचा अनुभव किंवा फ्रेशर अशांसाठी बीएसएफने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या १३ मे २०१९ पासून बीएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर १०७२ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या पदावर नियुक्त उमेदवारांना २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत मासिक वेतन असेल. १०७२ जागांपैकी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरच्या ३०० आणि हेड कॉन्स्टेबल रेडियो मेकॅनिकच्या ७७२ पदे आरक्षित आहेत. संबंधित उमेदवारांचे रेडिओ आणि टेलीव्हीजनमध्ये आयटीआय पूर्ण आणि पीसीएममध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण, त्यासोबतच १२ वी उतीर्ण असणे अनिवार्य आहे.

विशेष म्हणजे, १२ जून २०१९ च्या आधारे ही वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांची तीन टप्प्यात परिक्षा घेण्यात येणार आहे. १२ जुलै २०१९ पासून लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबर २०१९ पासून पीएसटी, पेट आणि कागदपत्रांची चाळणी करण्यात येणार आहे. तर ३० जानेवारी २०२० पासून अंतिम मेडिकल चाचणी घेण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता खुल्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी, कुठल्याही प्रवर्गातील महिला उमेदवार आणि बीएसएफच्या माजी कर्मचारी असलेले वारसदार मोफत अर्ज करु शकता.

१३ मे २०१९ पासून बीएसएफच्या अधिकृत bsf.nic.in. या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ जून २०१९ आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित उमेदवारांनी अर्ज भरावे, असे आवाहन बीएसएफकडून करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.