मोठी घराणी आमच्या संपर्कात : चंद्रकांत पाटील

कोल्हापुर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील मोठी राजकीय घराणी ही भाजपाच्या संपर्कात आहेत. राज्याच्या राजकारणातील पहिल्या भूकंपाची सुरवात ही, कॉंग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या पासून झाली आहे. येणाऱ्या काही दिवसातच उत्तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजपा- सेना युतीची कोल्हापुरात २४ मार्चला गांधी मैदानात जाहीर सभा घेण्यात येणार असून, या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. होणाऱ्या या सभेसाठी चंद्रकांत पाटील यांनी आज त्वरित कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

ते बैठकीत बोलतांना म्हणाले की, २००४ च्या सुमारास आपल्याला भाजपा सरकार स्थापन करता नाही आले.  सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला सात जागा कमी पडल्या होत्या. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवाराचा प्रचार हा प्रामाणिकपणे करावा लागणार आहे.  आपण जर या निवडणुकीत कमी पडलो, तर याची तक्रार मातोश्रीवर जाणार नाही याची सर्वानी दक्षता घ्यावी. या बैठकीला जिल्ह्यातील भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.