नियमबाह्य कामे करणाऱ्या ‘त्या’ 2 पोलिसांची उचलबांगडी !

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई संदिप सावंत व पैगंबर नदाफ( two-policemen) या दोघांना नियमबाह्य ( doing-illegal-work) कामे करणे चांगलेच महागात पडले आहे. या दोघांची नियमबाह्य कामे केल्याची गोपनीय तक्रार पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते (SP Tejaswi Satpute) .यांना प्राप्त होताच त्यांनी तात्काळ त्या दोघांची उचलबांगडी पोलिस मुख्यालयात केल्याने पोलिस दलात उलट सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान,या दोघांच्या चौकशीचे काम करमाळा विभागाचे डी.वाय.एस.पी.विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

खाकी ला मलीन करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिका-यावर कठोर कारवाई करू असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या पहिल्या भेटीप्रसंगी दिला होता.तरीही याकडे दुर्लक्ष करणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे.

पोलिस शिपाई सावंत, नदाफ या दोघांनाही मंगळवेढा पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी विशेष पथक म्हणून दोन महिन्यापासून नेमले आहे. यांच्याकडे अवैध वाळू उपसा, जुगार, मटका, अवैध दारू धंदे यावर कारवाईची जबाबदारी सोपवली होती. कारवाई करण्यापेक्षा त्यांचा अन्य गोष्टीकडे जास्त कल असल्याच्या तक्रारी होत्या. यापुर्वी जुगारातील मुद्देमाल हडप केल्याची तक्रार डी.वाय.एस.पी. यांच्याकडे केली होती. मात्र या चौकशीत त्यांना क्लिन चिट मिळाली होती. तक्रार येवूनही पुन्हा त्यांना अधिकार्‍यांना पथकात ठेवल्यामुळे नागरिकातून तक्रारीचा सूर वाढत गेला. त्यामुळे त्यांची उचलबांगडी मुख्यालयात करण्यात आली आहे.