शिवभोजन थाळीच्या दरात मोठी कपात ! जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी राज्य सरकारनं सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या (Shiv bhojan Thali Rate) दरात मोठी कपात करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता ही थाळी 1 नोव्हेंबर पासून पुढील 6 महिने 5 रुपयांना मिळणार आहे. आधी या थाळीचे दर 10 रुपये आकारण्यात येत होते.

आता हे नवीन दर पुढील 6 महिने असणार आहेत. तसंच मुदत संपलेल्या व कोरोना (Covid-19) विषाणू संक्रमणामुळं निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. यासाठी अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली आहे. बुधवारी ही बैठक घेण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव गुरुवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली विद्युत शाखेचं बळकटीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्ताविक बल्क ड्रग पार्क आणि औरंगबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पासाठी विशेष प्रोत्साहने देण्यात मान्यता देण्यात आली.

याशिवाय राज्यातील सर्व माजी सैनिक आणि त्यांची घरपट्टी व मालमत्त कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबवण्यात येणार आहे. दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून नव्यानं नविदा मागवण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्य म्हणजे मुंबई शहारातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठई नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे.