सिंचन घोटाळ्याचे ‘बैलगाडी’भर पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, त्यावेळी भाव जास्त होता, भाजपाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सिंचन घोटाळयाचे बैलगाडीभर पुरावे आम्ही केव्हाच विकले, त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता असं पत्रकारांशी बोलातना मुंबईत सांगितलं. त्यामुळे भाजपाला घरचा आहेर भेटला आहे. कोणालाही न डावलता, सर्वांना एकत्र घेवुन विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या असत्या तर भाजपाला आणखी 25 जागा जास्त मिळाल्या असत्या असं देखील त्यांनी ठणकाऊन सांगितलं.

सन 2014 मध्ये जो भाजपानं निर्णय झाला. तो केवळ मी जाहीर केला. तो माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता. त्यानंतर केवळ 6 महिन्यातच भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आली. पण, आता मात्र तसं काहीच घडलं नाही. सन 2019 मध्ये एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रकांत बावनकुळे आणि विनोद तावडे यांना भाजपानं निवडणुकीचं तिकीट दिलं नाही.

तिकीट दिलं नाही तो पक्ष श्रेष्ठींचा निर्णय होता. मात्र, सर्वांना एकत्र घेवुन निवडणुक लढवली गेली असती तर भाजपाच्या आणखी 25 जागा निवडुन आल्या असत्या असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. पत्रकारांनी त्यांना सिंचन घोटाळयाच्या पुराव्याबाबत विचारलं. तेव्हा एकनाथ खडसे म्हणाले, सिंचन घोटाळयाचे बैलगाडीभर पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता. खडसेंच्या या भुमिकेमुळे भाजपाला घरचा आहेर मिळाला आहे.

Visit : Policenama.com