पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला 

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रिंगातील वातावरण तापत आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खेडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे आहेत. या तिन्ही दिग्गज नेत्यांचे घरातील उमेदवार आहेत. त्यामुळे यांचे काय निकाल लागतील, ते त्यांचे गड राखण्यात यशस्वी होतील का, याची उत्सुकता लागली आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत अनेक भक्कम उमेदवारांना पराभव पहावा लागला. त्यातही सुप्रिया सुळे ६९,७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर हे होते. आता मात्र दौंड मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल सुप्रिया सुळेंना टक्कर देणार आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांनी पुर्ण पाठिंबा सुप्रिया सुळेंना दिला आहे. दुसरीकडे कांचन कुल यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत.

काँग्रेसमधील चर्चेत असणारे नाव राधाकृष्ण विखे पाटील हे वेगळ्या परिस्थितीत आहेत. मुलाने उमेदवारीसाठी अहमदनगरमधून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मुलगा भाजपमध्ये आणि वडील काँग्रेसमध्ये आहेत. विखेंनी अद्याप काँग्रेसला राजीनामा दिला नाही की भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नाही. मात्र विखे आपल्या मुलांला पाठिंबा देत आहेत.

जळगावमध्ये भाजपमध्ये गिरीश महाजन यांचे नाव वर आल्याने तेथील मंत्री एकनाथ खडसेंच्या नावाचा दबदबा कमी झाला. मात्र यंदा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या रावेरमध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय होईल का यावर सर्वांची नजर आहे.

लोकसभेच्या रिंगणातील चौथे नाव रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश हे आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे ते हि निवडणूक लढवत आहेत.  येथे त्यांच्यासमोर शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, राजकारणातील या दिग्गजांचे पुत्र-पुत्री, स्नुषा यांचा राजकारणातील पेपर आहे. हा पेपर हे मजबूतीने सोडवण्यात त्यांना यश येते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Loading...
You might also like