हिंदुस्थानी भाऊची एकता कपूर विरोधात FIR, वेब सिरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर एकता कपूरने आपले लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवलं आहे. तिने ‘अल्ट बालाजी’ नावाची ए वेब सीरिज अ‍ॅप देखील सुरु केले आहे. या अ‍ॅपला प्रक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यावर दाखवल्या जाणाऱ्या एका सिरिजमधून भारतीय जवानांचा अपमान करण्यात आला असा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला आहे. या प्रकरणावरून एकता कपूर विरोधात खार पोलिसात तक्रार केली आहे.

हिंदुस्तानी भाऊ हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने एकताच्या ट्रिपल एक्स या सीरिजवर संताप व्यक्त केला आहे. या वेब सिरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला असा आरोप त्याने केला आहे. ट्रिपल एक्स सिरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. या स्टोरीलाईनमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे, असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्तानी भाऊन इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून या तक्रारीबाबत माहिती दिली. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होत आहे.

PM मोदींना केले टॅग
हिंदुस्तानी भाऊने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. मात्र, यासंदर्भात एकता कपूर किंवा शोभा कपूर यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर पोलीस देखील त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करत आहेत. जेणे करून पुढील कार्यवाही करता येईल.

एकता कपूरने सैन्याची माफी मागावी
या शिवाय हिंदुस्तानी भाऊने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी भारतीय सैन्यदलाची माफी मागावी. भाऊ म्हणतो की, त्यांच्या वेब सिरिजमुळे भारतीय लष्कराच्या सन्मानाला ठेच लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांची माफी मागावी.