BJP-RSS चं काम द्वेष पसरवणं : राहुल गांधी

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकऱ्यांवर आणि गरिबांवर सर्वाधिक हल्ला केला आहे. भाजप-आरएसएसच काम द्वेष पसरवणं आणि फूट पाडणं आहे. भाजपची बी टीम सतत द्वेष पसरवत असते. यामुळे आम्ही भाजपच्या ए आणि बी टिमशी लढत आहोत असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते बिहारमधील किशनगंज येथील जाहीर सभेत बोलत होते.

ते म्हणाले, नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट केली आहे. येथील दुकानदार, शेतकरी, कामगार याना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी महाआघाडीला विजयी करून सत्ता बदलाचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी कृषीविषयक नवीन कायदे केले, हे कायदे शेकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी केले आहे. अंबानी आणि अडाणी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का ? एक गुजरात, एक मुंबई आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात २५०० रुपये मिळावेत असा आमचा विचार आहे असेही गांधी म्हणाले.