बिहार पोलिसांचा नवा खुलासा ! सुशांत सिंह राजपूत वापरत असलेलं सीम कार्ड दुसर्‍याच्या नावावर होतं, कॉल् डिटेल्सची ‘चाळणी’ सुरू

पाटणा : वृत्तसंस्था – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत अनेक दिवसांपासून मोबाईलमध्ये सिम वापरत होता, ते त्याच्या नावावर नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील एक सिम कार्ड त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याच्या नावावर आहे. पोलिसांनी सांगितले की, आता आम्ही कॉल डिटेल रेकॉर्ड ट्रॅक करत आहोत.

तसेच बिहार पोलिस सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सलियानच्या कुटूंबाची चौकशी करण्याचीही तयारी करत आहेत. बिहार पोलिसांनी दिशाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी अनेकवेळा फोन केला, पण कोणाशीही संपर्क झाला नाही. बिहार पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशी नंतर संपर्क साधून चौकशी केली जाईल. या दोघांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

दरम्यान केंद्रीय मंत्री आर.के. सिंह म्हणाले की, सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आरके सिंह म्हणाले की, यामुळे दोन राज्यांमध्ये वाद होणार नाही. मंत्री आरके सिंह म्हणतात की, बर्‍याच वेळा दोन्ही राज्यांमध्ये समन्वय नसतो. सीबीआय तपासामुळे असे होणार नाही. ते म्हणाले की, आता सुशांतच्या कुटूंबाचा विश्वास मुंबई पोलिसांवरून उठला आहे, ४०-४५ दिवसांत मुंबई पोलिसांनी काहीही केले नाही हे स्वाभाविक आहे.

आता पाटणाचे सिटी एसपी करतील टीमचे नेतृत्व
बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पाटणाचे सिटी एसपी विनय तिवारी हे मुंबईसाठी रवाना होतील. यापूर्वी तपासासाठी तेथे दाखल झालेल्या चार सदस्यीय पाटणा एसआयटीचे नेतृत्व सिटी एसपी करणार आहेत. एसएसपी रेंजने या प्रकरणाची पुष्टी केली आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी शनिवारी बिहार पोलिस सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यास सक्षम असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना बिहारचे डीजीपी म्हणाले होते. गरज भासल्यास तपासाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस रँकच्या अधिकाऱ्याला मुंबईला पाठवले जाईल.