‘टाइम बॉम्बवाले दहशतवादी नव्हेत, दारूविक्री करणारे तरुण’ पोस्ट व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिहारच्या राजदच्या महिला महासचिव असणाऱ्या गायत्री देवी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, जो आज दिवसभर झालं व्हायरल होत आहे. या फोटोत काही तरुणांनी त्यांच्या शरीरावर दारूच्या बाटल्या बांधल्या आहेत. फोटो शेअर करून गायत्री देवींनी ट्विट करत नितीश सरकारवर निशाण साधला आहे.

त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे की, ‘टाइम बॉम्बवाले दहशतवादी नाही, तर दारूविक्री करणारे तरुण आहेत. नितीश कुमार सुशील मोदीच्या राज्यात घरोघर जाऊन मद्याची होम डिलीवरी देणारे आत्मनिर्भर युवक आहेत’. बिहार सरकारचा दावा होता की बिहार आत्मनिर्भर बनत आहे.

राजद पाटणाने देखील मंगळवारी ट्विट करत बिहार सरकारवर निशाण साधला. राजदच्या मते आता बिहार मध्ये कुरियर कंपन्या सानिटायझरच्या नावाखाली मद्याची तस्करी करत आहेत. राजदचा असा आरोप आहे की, मद्याच्या हजार पेक्षा अधिक गाड्या भरून येतात पण दिखाव्यासाठी एक किंवा दोन पकडल्या जातात.

राजदचं असं म्हणणं आहे की, एकीकडे नितीश कुमार दारूबंदीसाठी मानवी साखळी बनवत आहेत. आणि दुसरीकडे अवैद्यरित्या दारूची विक्री सुरूच आहे. बिहार मध्ये एप्रिल 2016 पासून दारूबंदी लागू आहे.

राजदने ट्विट करत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ट्विट मध्ये लिहिलं की, ‘ऐका डीजीपी, पटना मधून एमबीबीएसचा विद्यार्थी मागील 11 ऑगस्ट पासून गायब आहे, बिहारच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येकाला सेलिब्रिटी व्हावं लागेल काय?’