बिहारचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नवी दिल्ली : बिहारच्या सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे कोरोनाने निधन झाले आहे. शहाबुद्दीन कोविड-19 ने पीडित होते आणि दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक प्रकरणात शिक्षा भोगत असलेले मोहम्मद शहाबुद्दीन तिहार जेलमध्ये बंद होते. मागील मंगळवारी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शहाबुद्दीन यांच्या उपचाराबाबत दिल्ली हायकोर्टात मागील आठवड्यात सुनावणी झाली होती. कोर्टाने निर्देश दिले होते की, हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी राजद खासदार शहाबुद्दीन यांना दिवसात दोन वेळा कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी देण्यात यावी. सोबतच कोर्टाने माजी खासदाराला दीन दयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते.